सलमान खानला सोडून बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यासोबत काम करायचेय प्रियांका चोप्राला! सलमान खान भारत सिनेमा सोडल्यानंतर प्रियांका चोप्राबदल बी-टाऊनमध्ये अनेक उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

सलमान खान भारत सिनेमा सोडल्यानंतर प्रियांका चोप्राबदल बी-टाऊनमध्ये अनेक उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चा सुरु असतानाच सुनील ग्रोवरने सांगितले की, प्रियांकाला त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. विशाल भारव्दाज यांच्या आगामी ‘पटाखा’ सिनेमाच्या गाण्याच्या लाँच दरम्यान सुनीलने या गोष्टीचा उलगडा केला. ज्यावेळी विशाल भारव्दाज यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही प्रियांकासोबत पुन्हा काम कधी करणार आहेत ? यावर सुनीलने मस्तीच्या अंदाजात उत्तर दिले तिला माझ्यासोबत काम करायचे आहे आणि आम्ही एकमेकांसोबत काम करतोय. ऐवढेच नाही तर सुनील पुढे हे देखील म्हणाला आशा आहे सिनेमाची शूटिंग पुढच्या वर्षीपर्यंत सुरु होईल. सध्या प्रियांका तिच्या लग्नाच्या तयारी व्यस्त आहे.

निक आणि प्रियांकाच्या लग्नाची तारीख अद्याप समजू शकलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी सांगितले की, निक आणि प्रियांकाच्या लग्नाबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. प्रोफेशनल पातळीवर ते दोघे त्यांची ठरलेली कामे पूर्ण करण्यात व्यस्त आहेत.
प्रियांका आणि निकने आपल्या लग्नासाठी एका खास शहराची निवडदेखील केली आहे. प्रियांका व निक दोघेही हवाईमध्ये लग्न करू शकतात. प्रियाका व निक दोघांनाही मीडिया आणि गर्दीपासून दूर एक खासगी सोहळा हवा आहे. त्यामुळे निसर्गसंपन्न समुद्राच्या कुशीत वसलेल्या हवाईला दोघांनीही पसंती दिली आहे. निकला समुद्र प्रचंड आवडतो. त्यामुळे याचठिकाणी हे जोडपे लग्नगाठ बांधेल, याची शक्यता अधिक आहे. हे लग्न कसे होईल, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. पण हा सोहळा पारंपारिक हिंदू पद्धतीने होईल, असे मानले जात आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*