चारकोपमध्ये धक्कादायक प्रकार…सहावीतील विद्यार्थिनीचा विनयभंग करणारे आरोपी मोकाट याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरु आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद धावरे यांनी दिली.

मुंबई – कांदिवलीतील चारकोप परिसरातील ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलमध्ये एक विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, २ दिवस उलटले तरी देखील शाळा प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे संतप्त पालकांनी सकाळी शाळेत एकच गोंधळ घातला. या दोषी मुलांवर शाळेकडून कारवाई व्हावी अशी पालकांची मागणी आहे. याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरु आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद धावरे यांनी  दिली.

सहावी इयत्तेत शिकणारी माझी मुलगी शाळेत आली असताना तिच्या पाठिमागून पाच – सहा मुले येऊन उभी राहिली आणि त्यांनी तिचा स्कर्ट वर करून तिची छेडछाड केली. ती रडत असतानाही शाळेच्या सुरक्षारक्षकाने त्यांना थांबवलं नाही. या घटनेची तक्रार विद्यार्थीनीने जेव्हा मुख्याध्यापिकेकडे केली तेव्हा त्यांनी या घटनेकडे कानाडोळा केला.  शिवाय मुलीलाच दमदाटी करून शांत केलं अशी तक्रार मुलीच्या आईने केली आहे. यानंतर पीडित मुलीच्या आईने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तिथेही त्यांची निराशा झाली. आठ तासानंतरही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली नाही. रात्री दोन वाजता मुलीचं मेडिकल केलं गेलं. सकाळी 11 वाजताही पोलीस शाळेत गेले नाहीत. त्यावेळी पालकांनी त्यांना जाब विचारला असता आपल्याकडे स्टाफ उपलब्ध नसल्याचं तक्रारकर्त्या मुलीच्या आईला पोलिसांनी खेदजनक उत्त्तर दिले. या घटनेचं चांगले, व्यवस्थित दिसेल असे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध झाले नाही. यानंतर, मुलीच्या आईनं आणि शाळेतल्या आणखीन काही पालकांनी शाळेत येऊन गोंधळ घातल्यानंतर पोलीस शाळेत हजर झाले. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत पालकांनी शाळेत एकच गोंधळ घातला होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*